National News – Marathi

Click here for Free NRI Matrimony Listing App
  • इंडिगोचा सावळा गोंधळ, नागपूरहून पुण्यासाठी निघालेले प्रवासी हैदराबादला पोहोचले December 6, 2025
    नागपूर : इंडिगो विमानांच्या बिघडण्याचे, अपघात होण्याचे आणि क्रू मेम्बर्सच्या सावळ्या गोंधळाचे सत्र हे अजूनही सुरूच आहे. सलग दुसऱ्या दिवशी इंडिगोच्या शेकडो उड्डाणांना रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे प्रवाशांना प्रचंड मनस्ताप झाला. इंडिगोच्या या बेफिकीर कामामुळे बरेच प्रवासी एकाच ठिकाणी अडकून पडले. इंडिगोचे एक विमान नागपूरहुन पुण्याला जाणार होते. पण ते पुण्याला […]
  • वरळीत शिउबाठाची दादागिरी; भाजपच्या कामगार संघटनेचा फलक लावण्यास विरोध December 6, 2025
    मुंबई : विधानसभा निवडणुकीत वरळीची जागा कशीबशी जिंकलेल्या शिउबाठाला अद्याप राजकीय स्थितीचे भान आलेले दिसत नाही. वरळीतील एका खासगी हॉटेलमध्ये भाजपप्रणित युनियनचा फलक लावण्यावरून शिउबाठाच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी राडा घातला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेत, कठोर कारवाईचा इशारा दिला आहे. वरळीतील हॉटेल सेंट रेजिसमध्ये भाजपने आपली क […]
  • बिग बॉस १९ स्पर्धकांना दाखवली ट्रॉफीची पहिली झलक, टॉप ५ स्पर्धकांचे डोळे दिपले December 6, 2025
    मुंबई : बिग बॉस १९ चा ग्रँड फिनाले जवळ येत असताना घरातील पाच फायनलिस्ट निश्चित झाले आहेत. बिग बॉसने या सीझनच्या ट्रॉफीची पहिली झलक दाखवून घरातील स्पर्धकांना रोमांचित केले. यंदाची ट्रॉफी विशेष आहे कारण तिचा लूक अगदी तसा आहे जसा सलमान खान शोच्या प्रोमोमध्ये पोज देताना दिसतो. पाच फायनलिस्ट जाहीर फायनल फेरीसाठी निवडले गेलेले पाच स्पर्धक आहेत गौरव खन्ना, अमल मलिक […]
  • मोदी पुतिन बैठकीतले महत्त्वाचे मुद्दे आणि भारत आणि रशिया दरम्यानच्या करारांची यादी जाणून घ्या एका क्लिकवर... December 5, 2025
    नवी दिल्ली : भारत आणि रशिया यांच्यातील धोरणात्मक मैत्रीला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या आणि दिल्लीत होत असलेल्या २३ व्या शिखर परिषदेच्या बैठकीच्या निमित्ताने रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत. पुतिन आणि मोदी यांच्यात हैदराबाद हाऊस येथे झालेल्या बैठकीनंतर दोन्ही नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत पंतप् […]
  • पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून आरे कॉलनी व दिंडोशी वन क्षेत्रातील रहिवाश्यांना घरे द्या' December 5, 2025
    मुंबई : आरेमध्ये तसेच दिंडोशी येथील वन क्षेत्रात गेली अनेक वर्ष वास्तव्य रहिवाशी हि देखील माणसे असून ते मुलभूत सुविधेपासून वंचित आहेत. त्यांना या मुलभूत सुविधा देण्यासाठी अनेक अडचणीचा सामना करावा लागत असल्याने आरे कॉलनी तसेच दिंडोशी वन क्षेत्रात राहणाऱ्या रहिवाश्यांना पंतप्रधान आवास योजनांच्या माध्यमातून घरे उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी मुंबई उत्तर पश्चिम ल […]
  • दीड वर्षांच्या जलतरणपटू 'वॉटर बेबी' वेदाने इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड वर कोरलं नाव December 5, 2025
    रत्नागिरी : वय फक्त दीड वर्ष… आणि कामगिरी थेट राष्ट्रीय स्तरावर! रत्नागिरीच्या वेदा सरफरेने देशातील सर्वात लहान भारतीय जलतरणपटू होण्याचा मान पटकावत इंडियन बुक ऑफ रेकॉर्डमध्ये आपलं नाव कोरलं आहे. अवघ्या ९ महिन्यांची असताना पाण्यात हातपाय मारून तिने आपली क्षमता दाखवून ती कोकणची ‘जलपरी’ ठरली आहे. वेदाचा मोठा भाऊ रूद्र हा राज्यस्तरीय जलतरणपटू. त्याच्या सरावासाठी […]
  • पुणे जिल्ह्यात बिबट्यांचा वावर वाढला; मोबाईलवर बोलत असलेल्या तरुणावर हल्ला, परिसरात भीती December 5, 2025
    पुणे : जिल्ह्यात बिबट्यांचा वावर झपाट्याने वाढत असून, रात्रीच्या वेळी नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. मानवी वस्त्यांच्या जवळपास हे वन्य प्राणी मुक्तपणे फिरताना दिसत असून, गेल्या काही दिवसांत अनेक ठिकाणी हल्ल्यांच्या घटना नोंदवल्या गेल्या आहेत. नारायणगाव–जुन्नर रस्त्यालगत साकार नगरी सोसायटीजवळ एका तरुणावर झालेला हल्ला चिंताजनक ठरला आहे. तनिष […]

 

Unable to display feed at this time.

 

Unable to display feed at this time.