Maharashtra state news- Marathi

Click here for Free NRI Matrimony Listing App
  • प्रवाशांच्या सुरक्षेसाठी यंत्रमानव ‘एएससी अर्जुन’ तैनात January 25, 2026
    माहितीच्या सहाय्याने प्रवाशांशी संवाद साधण्याची क्षमता विशाखापट्टणम : सध्याचे जग कृत्रिम बुद्धिमत्ता व रोबोटिक्सचे आहे. आपली बहुतांशी कामे मानव आता यंत्रमानवाकडून करून घेऊ लागला आहे. रेल्वे स्थानकावरील गर्दीचे व्यवस्थापन आणि प्रवाशांच्या सामानाची सुरक्षा करण्यासाठी भारतीय रेल्वेनेही आपल्या कामात यंत्रमानवाचा वापर करायला सुरुवात केली आहे. विशाखापट्टणम रेल्वे […]
  • एका महिन्यात ९०० कुत्र्यांची हत्या January 25, 2026
    तेलंगणा : तेलंगणामधील जगतियाल जिल्ह्यातील पेगाडपल्ली गावात सुमारे ३०० भटक्या कुत्र्यांना मारण्यात आले आहे. या भटक्या कुत्र्यांना विषारी इंजेक्शन देऊन मारण्यात आले. गावाच्या सरपंच आणि ग्रामपंचायत सचिवांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एएनआयकडून मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारीच्या आधारे, पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम ३२५ (आयपीसी) तसेच भारतीय दंड संहि […]
  • ५ राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा January 25, 2026
    थंडी आणखी वाढणार नवी दिल्ली : देशभरात हवामानाचा लहरीपणा वाढताना दिसत असून कधी कडाक्याची थंडी तर कधी अचानक पावसाचा मारा असा अनुभव नागरिकांना येत आहे. दरम्यान, भारतीय हवामान विभागाने पुढील ४८ तासांसाठी आणखी एक महत्त्वाचा इशारा जारी केला असून देशातील काही भागांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पावसामुळे तापमानात २ ते ३ अंश सेल्सियसने घट होण्याची श […]
  • दीड तासांच्या उपचारांसाठी १.६५ लाख January 25, 2026
    न्यूयॉर्क : अमेरिकेतील आरोग्यसेवेचे विदारक वास्तव दाखवणारी एक घटना सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. न्यूयॉर्कमध्ये एका व्यक्तीला अवघ्या दीड तासांच्या रुग्णालयातील उपचारांसाठी तब्बल १,८०० अमेरिकन डॉलर्स म्हणजेच सुमारे १.६५ लाख रुपयांचे बिल भरावे लागले, तेही चांगला मेडिकल इन्शुरन्स असतानाही. संबंधित व्यक्तीने सोशल मीडियावर दिलेल्या माहितीनुसार, ख्रिसमसच्या […]
  • भारत स्वत:चे अंतराळ स्थानक उभारणार ! January 25, 2026
    पहिले घटक २०२८ मध्ये अंतरिक्षात नवी दिल्ली : भारतीय अंतरिक्ष संशोधन संस्था (इस्रो) देशासाठी अत्यंत महत्त्वाकांक्षी अशा भारतीय अंतरिक्ष स्थानकाच्या उभारणीस सुरुवात करत आहे. हे स्थानक पृथ्वीच्या खालच्या कक्षेत उभारले जाणार असून, त्यामुळे भारताला अंतरिक्षात कायमस्वरूपी वास्तव्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. येथे वैज्ञानिक आणि अंतरिक्ष प्रवासी दीर्घकाळ राहून विविध […]
  • जॉर्जियात कौटुंबिक वादातून गोळीबार January 25, 2026
    भारतीय नागरिकासह चार जणांचा मृत्यू अटलांटा : अमेरिकेतील जॉर्जिया राज्यात कथित कौटुंबिक वादातून झालेल्या गोळीबाराच्या घटनेत एका भारतीय नागरिकासह चार जणांचा मृत्यू झाला आहे. ही घटना शुक्रवारी पहाटे घडली असून, संशयित आरोपीने पत्नी आणि इतर तीन नातेवाइकांवर गोळीबार केल्याची माहिती समोर आली आहे. अटलांटा येथील भारतीय वाणिज्य दूतावासाने या घटनेबाबत तीव्र दुःख व्यक्त […]
  • रामध्वज ७ खंडांवर फडकणार January 25, 2026
    अयोध्या : अयोध्येतून एक अभूतपूर्व आणि ऐतिहासिक धार्मिक उपक्रम सुरू झाला असून, राम मंदिराच्या शिखरावर फडकवला जाणारा पवित्र धर्मध्वज आता जागतिक स्तरावर पोहोचणार आहे. सनातन संस्कृतीचा संदेश संपूर्ण विश्वात पोहोचावा, या संकल्पनेतून रामध्वज यात्रा सुरू करण्यात आली असून हा ध्वज पृथ्वीवरील सातही खंडांवर फडकवण्याची प्रतिज्ञा करण्यात आली आहे. अयोध्येतील रामजन्मभूमी प […]
  • अलवारमध्ये उभारला जाणार पहिला जैविक उद्यान प्रकल्प January 25, 2026
    जयपूर : राजस्थान आपल्या वन्यजीव पर्यटनात आणखी एक महत्त्वाची भर घालणार असून, अलवार जिल्ह्यातील कटी घाटी परिसरात अत्याधुनिक जैविक उद्यान विकसित करण्यात येणार आहे. हा प्रकल्प वन्यजीव संवर्धन, पशुसेवा आणि पर्यटन या तिन्ही बाबी एकत्र आणणारा असून, पूर्ण झाल्यानंतर तो राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातील (NCR) पहिला असा जैविक पार्क ठरणार आहे. प्रस्तावित उद्यान कटी घाटी व […]
  • तैवानभोवती चीनचा लष्करी वेढा January 25, 2026
    २४ तासांत २६ विमाने, ६ युद्धनौकांची घुसखोरी बीजिंग : जगाच्या पाठीवर आधीच रशिया–युक्रेन आणि मध्य-पूर्वेतील संघर्ष सुरू असताना, आता आशिया खंडातही युद्धाचे ढग गडद होऊ लागले आहेत. चीन आणि तैवानमधील तणाव शिगेला पोहोचला असून, चीनने तैवानभोवती लष्करी हालचाली अधिक तीव्र केल्या आहेत. तैवानच्या संरक्षण मंत्रालयानुसार, शनिवारी सकाळी ६ वाजेपर्यंतच्या २४ तासांत चीनच्या २ […]
  • मध्य प्रदेशात वाघांच्या मृत्यूत वाढ January 25, 2026
    उच्च न्यायालयाची केंद्र व राज्य सरकारांना नोटीस भोपाळ : मध्य प्रदेशात वाघांच्या मृत्यूत चिंताजनक वाढ झाल्याबद्दल तीव्र चिंता व्यक्त करत मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने केंद्र व राज्य सरकारांना नोटीस बजावली आहे. या प्रकरणी आपली भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले असून वन व पर्यावरण विभागांसह राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाला (एनटीसीए)ही नोटीस पा […]

 

 

Unable to display feed at this time.