Cinema & Entertainment News- Marathi

Click here for Free NRI Matrimony Listing App
  • कर्नाटक काँग्रेसमध्ये पडले दोन गट, ताकद वाढवण्यासाठी दोन्ही गटांकडून आमदारांना ५० कोटी रुपयांसह फ्लॅट आणि फॉर्च्युनरची ऑफर ? November 24, 2025
    बंगळुरू : मुख्यमंत्री सिद्धारमैया आणि उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार या दोघांच्या नेतृत्वात कर्नाटक काँग्रेसमध्ये दोन गट पडले आहेत. प्रत्येक गट आपली ताकद वाढवण्यासाठी प्रतिस्पर्धी गटाच्या आमदारांना ५० कोटी रुपयांसह फ्लॅट आणि फॉर्च्युनर गाडीची ऑफर देत आहे; असा आरोप भाजप नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते चालवाडी नारायणस्वामी यांनी केला आहे. पत्रकार परिषद […]
  • अस्लम शेख प्रकरण चिघळले, मालाडच्या मालवणीत भाजप युवा मोर्चा आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आमनेसामने November 24, 2025
    मुंबई : मालाडच्या मालवणी येथे अग्निशामक दलाच्या कार्यालयासमोर भाजप युवा मोर्चाचे शेकडो कार्यकर्ते एकत्र आले. या कार्यकर्त्यांनी काँग्रेसचे आमदार अस्लम शेख यांच्या विरोधात घोषणा दिल्या. या भागातच काँग्रेसचे आमदार अस्लम शेख यांचे एक कार्यालय आहे. भाजप युवा मोर्चाने घोषणाबाजी सुरू करताच काँग्रेस कार्यकर्तेही रस्त्यावर आले. यामुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली. […]
  • वरळीतील आत्महत्या प्रकरण: पतीचे विवाहबाह्य संबंध आणि सासरच्या छळाला कंटाळून डॉक्टरची आत्महत्या, गुन्हा दाखल November 23, 2025
    मुंबई : मुंबईतील वरळीमध्ये पंकजा मुंडे यांचा PA अनंत गर्जे याची पत्नी डॉक्टर गौरी पालवे गर्जे हिने शनिवारी संध्याकाळी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना समजताच परिसरात आणि राजकीय वर्तुळात तणाव निर्माण झाला. गौरी पालवे आणि अनंत गर्जे यांचा विवाह फेब्रुवारी महिन्यात बीडमध्ये झाला होता. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून विवाहबाह्य संबंधांमुळे पती-पत्नीमध्ये सातत […]
  • मुथुस्वामीचे पहिले शतक आणि जॅन्सनची दमदार खेळी; दक्षिण आफ्रिकेने उभारला ४८९ धावांचा डोंगर November 23, 2025
    गुवाहाटी : गुवाहाटी येथे सुरू असलेल्या भारत–दक्षिण आफ्रिका दुसऱ्या कसोटी सामन्यात पाहुण्या संघाने दुसऱ्या दिवशी प्रभावी फलंदाजी करत ४८९ धावांची मोठी मजल मारली. दक्षिण आफ्रिकेच्या खालच्या फळीतील फलंदाजांनी जबरदस्त कामगिरी बजावत भारतीय गोलंदाजीचा कस लावला. सेनुरन मुथुस्वामीने कारकिर्दीतील पहिले कसोटी शतक, तर मार्को जॅन्सनने ९३ धावांची झळाळती खेळी करत संघाला भक […]
  • भारत–दक्षिण आफ्रिका मालिकेआधी दुखापतींचे सावट; गिल आणि अय्यर दोघेही एकदिवसीय मालिकेबाहेर November 23, 2025
    मुंबई : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या आगामी एकदिवसीय मालिकेपूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. आधीच उपकर्णधार श्रेयस अय्यर २-३ महिन्यांसाठी मैदानाबाहेर आहे. आता संघाचा कर्णधार शुभमन गिलही ३० नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या मालिकेतून बाहेर राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. कोलकात्यात झालेल्या पहिल्या कसोटीत गिलच्या मानेला झालेल्या दुखापतीमुळे त्याला पुढील काही […]
  • सांगलीत स्मृती मंधानाच्या लग्नाआधी अनपेक्षित घटना; वडिलांची तब्येत बिघडल्याने विवाह सोहळा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलला November 23, 2025
    सांगली : भारतीय महिला क्रिकेटपटू स्मृती मंधाना आणि पलश मुच्छल यांच्या विवाह सोहळ्यात एक अनपेक्षित विघ्न आले. लग्न समारंभाची थाटामाटात तयारी सुरू असताना स्मृतीच्या वडिलांची प्रकृती अचानक बिघडली. त्यामुळे विवाह सोहळा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आला आहे. सकाळी नाश्ता करताना श्रीनिवास मंधाना यांची तब्येत बिघडली. काही वेळातच त्यांची प्रकृती अधिकच खराब झाली. त […]
  • स्मृती–पलाशच्या विवाहसोहळ्याची जोरदार चर्चा; संगीत समारंभाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल November 23, 2025
    सांगली : भारतीय क्रिकेटमधील स्टार खेळाडू स्मृती मंधाना आणि प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक व चित्रपट निर्माते पलाश मुच्छल यांच्या राजेशाही लग्नसोहळ्याची सध्या सर्वत्र चर्चा रंगली आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या प्री-वेडिंग कार्यक्रमांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. प्रपोजलपासून ते हळद, मेहेंदी आणि आता झालेल्या धमाल संगीत समारंभापर्यंत प् […]
  • मुंबईच्या मतदारयादीत ११ लाख दुबार मतदार November 23, 2025
    मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारयादीबाबत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महानगरपालिकेने प्रकाशित केलेल्या प्रारूप मतदारयादीत तब्बल ११ लाखांपेक्षा जास्त मतदारांची नावे एकापेक्षा अधिक ठिकाणी असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे निवडणूक प्रक्रियेची विश्वासार्हता टिकवणे हे निवडणूक आयोगासमोर मोठे आव्हान आहे. प्रारूप यादी तपासताना ११,०१,५०५ […]
  • स्थानिक स्वराज्य निवडणुकांसाठी शिवसेनेची मोठी तयारी; मराठवाड्यात अनुभवी नेत्यांना प्रमुख भूमिका November 23, 2025
    मुंबई : मराठवाड्यातील शिवसेना (शिंदे गट) संघटनात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. आगामी निवडणुका लक्षात घेऊन मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये अनुभवी आमदार आणि ज्येष्ठ नेत्यांना जिल्हा संपर्कप्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. या बदलांमधून पक्षाने निवडणुकीकडे गांभीर्याने पाहत संघटना मजबुतीकडे स्पष्ट वा […]
  • परभणीत राजकीय राडा; पाथरीत दगडफेक आणि तलवारीने हल्ले November 23, 2025
    परभणी : नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. स्थानिक स्तरावर प्रचाराला जोरदार रंग चढला असून अनेक नेते आणि उमेदवार मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी रात्रंदिवस प्रयत्न करत आहेत. काही ठिकाणी बिनविरोध निवडणुका व्हाव्यात यासाठी हालचाली सुरू असताना, काही भागांत मात्र संघर्षाची शक्यता वाढत आहे. अशातच परभणी जिल्ह्यातील पाथ […]

 

 

Unable to display feed at this time.