Business & Finance news- Marathi

Click here for Free NRI Matrimony Listing App
  • BMC Election 2026 : बोटावरची शाई पुसून गैरकृत्य कराल तर सावधान! आयोगाने दिला कायदेशीर कारवाईचा इशारा January 15, 2026
    मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानादरम्यान 'बोटावरील शाई पुसली जात असल्याच्या' अफवा आणि तक्रारींच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने आज, १५ जानेवारी २०२६ रोजी अधिकृत स्पष्टीकरण दिले आहे. बोटावर लावलेली शाई पुसून पुन्हा मतदान करण्याचा प्रयत्न करणे हे एक गंभीर गैरकृत्य असून, अशा व्यक्तींविरुद्ध कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा […]
  • ६६ नगरसेवकांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा January 15, 2026
    मुंबई : राज्यातील महानगरपालिका निवडणुकीत ६६ नगरसेवकांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला असून, याविरोधात मनसेच्या अविनाश जाधव यांनी दाखल केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली. उमेदवार बिनविरोध निवडून आला असला, तरी मतदारांसाठी नोटाचा पर्याय असावा, अशी मागणी याचिकेत करण्यात आली होती. मात्र, न्यायालयाने याचिकाकर्त्यांना खडेबोल सुनावत ही याचिका फेटाळून […]
  • संजय गांधी उद्यानात तीन छाव्यांचे आगमन January 15, 2026
    कांदिवली: बोरिवली पूर्व येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरण, नवी दिल्ली यांच्या अदलाबदल कार्यक्रमांतर्गत गुजरातच्या जुनागढ येथील सक्करबाग प्राणीसंग्रहालयातून आणलेल्या सिंह मानस आणि सिंहीणी भारती या जोडीने ११ जानेवारी रोजी तीन निरोगी शावकांना जन्म दिला, अशी माहिती उद्यानाच्या संचालिका अनिता पाटील यांनी दिली. सध्या उद्यानात […]
  • Mumbai Port : मुंबई बंदर होणार 'प्रदूषणमुक्त'! JNPA मध्ये हायटेक सुविधा, मालवाहतूक होणार सुपरफास्ट...मुंबई बंदराने काढली पहिली निविदा January 15, 2026
    मुंबई : वाढते प्रदूषण आणि हवामान बदलाचे संकट लक्षात घेता, मुंबई बंदर प्राधिकरणाने 'हरित बंदर' (Green Port) बनण्याच्या दिशेने आपले पहिले पाऊल टाकले आहे. समुद्रातून येणाऱ्या महाकाय मालवाहू जहाजांना बंदरापर्यंत सुरक्षितपणे आणण्यासाठी आतापर्यंत डिझेलवर चालणाऱ्या 'टग बोटीं'चा वापर केला जात असे. मात्र, आता या कामासाठी अत्याधुनिक विद्युत बॅटरीवर […]
  • आज मतदानदिनी मेट्रो-३ मध्यरात्रीपर्यंत धावणार January 15, 2026
    मुंबई : मुंबई महापालिकेच्या आज १५ जानेवारी रोजी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुंबई सज्ज झाली आहे. मतदानाच्या कार्यात गुंतलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी मुंबई मेट्रोच्या 'अॅक्वा लाईन'ने (मेट्रो-३) कंबर कसली असून, गुरुवारी विशेष अतिरिक्त फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. सकाळी ५ ते रात्री १२ पर्यंत सेवानिवडणूक ड्युटीवर असलेल्या कर्मचाऱ्यांन […]