National News – Marathi

Click here for Free NRI Matrimony Listing App
  • वंदे भारतबाबत मोठी घोषणा! जून पर्यंत देशातील सर्व राज्यांत पोहोचणार June 2, 2023
    नवी दिल्ली : रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी शुक्रवारी वंदे भारत ट्रेनबाबत मोठी घोषणा केली. ते म्हणाले की, वंदे भारत ट्रेन जूनपर्यंत सर्व राज्यांमध्ये पोहोचेल. पुढील वर्षाच्या मध्यापर्यंत २०० शहरे ‘वंदे भारत’शी जोडण्याचे आमचे ध्येय आहे. राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील भाजप मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव बोलत होते. ते म्हणाले, भ […]
  • ओडिशात कोरोमंडल एक्स्प्रेस आणि मालगाडी यांचा भीषण अपघात June 2, 2023
    १७९ जण जखमी, ३० जणांचा मृत्यू ओडिशा: ओडिशातील बालासोर येथे कोरोमंडल एक्स्प्रेस आणि मालगाडी यांचा बहनगा स्टेशनजवळ संध्याकाळच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. कोरोमंडल एक्स्प्रेस आणि मालगाडी या दोन्ही गाड्या एकाचवेळी एकाच रुळावर आल्याने हा अपघात झाला. कोरोमंडल एक्स्प्रेसची मालगाडीला जोर धडक बसली. त्यानंतर रेल्वेचे काही डब्बे रुळावरून घसरले. प्रशासनाने अपघाताबाब […]
  • ‘चाय पे चर्चा’नंतर भाजपाकडून लोकसभेसाठी ‘टिफिन बैठक’ June 2, 2023
    नवी दिल्ली : भाजपने २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीची रणणिती आखण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून भाजपकडून एक आगळावेगळा प्रयोग राबवणार आहे. या उपक्रमाला भाजपने टिफिन बैठक असे नाव दिले आहे. ३ जून रोजी याला सुरुवात होईल. भाजपच्या २०२४ च्या लोकसभा निवडणूकीची मोहीम राजस्थानमधील अजमेर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पहिल्या मोठ्या जाहीर […] […]
  • अमित शहा यांच्या आवाहनानंतर १४० शस्त्रांचे आत्मसमर्पण June 2, 2023
    इम्फाळ: मणिपूर हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बंडखोरांना शस्त्रे टाकून आत्मसमर्पण करण्याचे आवाहन केले होते. यानंतर मणिपूरच्या विविध ठिकाणांहून १४० शस्त्रे आत्मसमर्पण करण्यात आली आहेत. दरम्यान, आज इम्फाळ पूर्व, विष्णुपूरसह अनेक हिंसाचारग्रस्त जिल्ह्यांमध्ये कर्फ्यू ८ ते १२ तासांसाठी शिथिल करण्यात आला आहे. तामेंगलाँग, नोनी, सेनाप […]
  • दहशतवाद्यांचे भिवंडी कनेक्शन! भिवंडीत कॉलसेंटर सापडले June 2, 2023
    गुजरात सायबर सेलच्या पथकाने तीन जणांना भिवंडीत पकडले अहमदाबाद/ भिवंडी : पाकिस्तानी गुप्तचर संघटना आयएसआयसाठी काम करणाऱ्या ‘एसएफजे’ या दहशतवादी संघटनेसाठी काम करणाऱ्या टोळीचे भिवंडीतील कॉलसेंटर अहमदाबाद येथील सायबर सेलने उद‌्ध्वस्त केले. या ठिकाणी काम करणाऱ्या तिघांना ताब्यात घेतले असून सीम कार्डचे तब्बल चार बॉक्स जप्त करण्यात आले आहेत. गुजरात पोलीस कारवाईची […]
  • राज्यात मान्सून ‘या’ दिवशी येणार! June 2, 2023
    केरळच्या किनारपट्टीवर ४ किंवा ५ जूनला धडकणार! केरळ : मान्सून सध्या दक्षिण अरब सागर, मालदीव, कोमोरिन क्षेत्रात आहे. दक्षिण बंगालची खाडी व पूर्व मध्य बंगाल खाडीतही मान्सून आगेकूच सुरू असून मान्सून ४ किंवा ५ जूनपर्यंत केरळ किनारपट्टीवर धडकेल. मान्सूनचे आगमन जरा लांबले असले तरीही गेल्या १०-११ दिवसांत मान्सूनने केलेली वाटचाल आता एकाच दिवसात पूर्ण केल्याचे […] […]
  • पैलवानांच्या शोषणाचे प्रकरण केंद्र सरकार संवेदनशीलपणे हाताळतेय June 1, 2023
    केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकुर यांनी व्यक्त केला विश्वास नवी दिल्ली (प्रतिनिधी) : ‘महिला कुस्तीपटूंनी केलेल्या शोषणाच्या आरोपाचेप्रकरण केंद्र सरकार संवेदनशीलपणे हाताळत आहे’, असे केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगितले.महिला कुस्तीपटूंनी केलेल्या मागणीनुसार या प्रकरणी एक समिती स्थापन करण्यात आली असून तपास सुरु असल्याचे ते म्हणाले. साक्षी मलिक, व […]

 

Unable to display feed at this time.

 

Unable to display feed at this time.