Sports News – Marathi

Click here for Free NRI Matrimony Listing App
 • तिलक वर्माला क्रिकेटचे योग्य ज्ञान May 17, 2022
  मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई इंडियन्स संघातून खेळणारा युवा फलंदाज तिलक वर्माने दमदार फलंदाजी करत सर्वांचे लक्ष वेधले आहे. त्याच्या या खेळीचे कौतुक महान माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी केले आहे. ‘तिलकला क्रिकेटचे योग्य ज्ञान असून तो भारतासाठी तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये खेळू शकतो’, असे गावस्कर म्हणाले. गावस्कर यांनी एका क्रीडा वाहीनीच्या शोमध्ये बोलताना […]
 • हैदराबादचा निसटता विजय May 17, 2022
  मुंबई (प्रतिनिधी) : रोहित शर्मा, इशन किशनची धडाकेबाज सलामी आणि टीम डेविडच्या तुफानी फलंदाजीमुळे मुंबईचा संघ हैदराबादविरुद्ध विजयाच्या उंबरठ्यावर होता. मात्र लयीत असलेला डेविड चुकीच्या वेळी धावचित झाल्याने मुंबईला पराभवाची चव चाखावी लागली. हैदराबादने हा सामना अवघ्या ३ धावांनी जिंकत गुणफलक वाढविले. राहुल त्रिपाठीची फलंदाजी आणि उम्रान मलिक, भुवनेश्वर कुमार यांच […]
 • लखनऊ ‘प्ले-ऑफ’च्या वेशीवर May 17, 2022
  केएल राहुलच्या नेतृत्वाखालील लखनऊ सुपर जायंट्सने आयपीएल २०२२ मधील आपल्या पहिल्याच हंगामात आतापर्यंत चमकदार कामगिरी केली आहे. बलाढ्य लखनऊचा संघ प्लेऑफच्या तिकीटापासून फक्त एक विजय दूर आहे. दुसरीकडे, कोलकाता नाईट रायडर्सला अंतिम चारमध्ये पोहोचण्यासाठी हा सामना मोठ्या फरकाने जिंकल्यानंतरही इतर संघांच्या निकालावर अवलंबून राहावे लागणार आहे. मुंबई (प्रतिनिधी) : को […]
 • जोकोविचची इटली ओपन चषकावर मोहोर May 17, 2022
  रोम (वृत्तसंस्था) : जगातील अव्वल दर्जाचा खेळाडू सर्बियाचा नोवाक जोकोविचने रविवारी इटली ओपनच्या अंतिम सामन्यात स्टेफानोस सितासिपासला ६-०, ७-६ असे पराभूत करत सहाव्यांदा किताब आपल्या नावे केला. जोकोविचचे यंदाच्या वर्षातील हे पहिलेच विजेतेपद आहे. यंदाच्या वर्षाच्या सुरुवातीलाच ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेपूर्वी लसीकरणावरून वादाची ठिणगी पडली होती. त्यानंतर काही काळ जो […]
 • दिल्लीचे विजयाक्षर May 16, 2022
  नवी मुंबई (वृत्तसंस्था) : शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, आणि कुलदीप यादव या गोलंदाजांच्या तिकडीची धावा रोखणारी आणि बळी मिळवणारी कामगिरी सोमवारी पंजाबविरुद्ध दिल्लीच्या विजयात मोलाची ठरली. मिचेल मार्शने संयमी खेळी करत दिल्लीला सन्मानजनक धावसंख्या उभारून दिली. या सामन्यातील विजयामुळे दिल्लीच्या खात्यात १४ गुण झाले असून त्यांनी चौथ्या स्थानी झेप घेतली. दरम्यान या स […]
 • हैदराबादची नाडी आता मुंबईच्या हातात… May 16, 2022
  मुंबई (प्रतिनिधी) : इंडियन प्रीमियर लीगच्या प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्याच्या अंधुक आशा जिवंत ठेवण्यासाठी सनरायझर्स हैदराबादला मुंबई इंडियन्सविरुद्धच्या मंगळवारच्या सामन्यात सलग पाच पराभवांचा सिलसिला तोडावा लागेल. मुंबई इंडियन्सविरुद्ध पराभव झाल्यास सनरायझर्सच्या प्लेऑफमध्ये जाण्याच्या शक्यता मावळतील. सनरायझर्सने सलग पाच सामने जिंकल्यानंतर सलग पाच सामने गमावले […]
 • पंजाब-दिल्लीसाठी ‘जिंकू किंवा मरू’ May 16, 2022
  मुंबई (प्रतिनिधी) :सातत्य राखण्यासाठी धडपडणारे दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्ज यांच्यातील सोमवारी आपापल्या प्ले-ऑफच्या आशा जिवंत ठेवण्यासाठी परस्परांवर मात करून स्वतःचा गुणतालिकेतील क्रमांक अधिक उंचावण्याचे लक्ष्य ठेवतील. दोन्ही संघांना चालू हंगामात आतापर्यंत सलग दोन सामने जिंकता आलेले नाहीत आणि अशात प्लेऑफसाठी “जिंकू किंवा मरू” असलेल्या या सामन्यात दोन्ही […]
 • राजस्थानच रॉयल्स लखनऊवर २४ धावांनी विजय May 15, 2022
  मुंबई (प्रतिनिधी) : गुजरातच्या ‘प्ले-ऑफ’मधील प्रवेशानंतर राजस्थान आणि लखनऊ यांच्यातील रविवारच्या लढतीकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. या सामन्यात राजस्थानने लखनऊला चीत करत त्यांचा ‘प्ले-ऑफ’मधील प्रवेश आणखी लांबवला. विजयामुळे राजस्थानने गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी झेप घेत ‘प्ले-ऑफ’च्या दिशेने पाऊल टाकले असून रेसमधील रंगत आणखी वाढवली आहे. प्रत्युत्तरार्थ फलंद […]

 

Unable to display feed at this time.

 

Unable to display feed at this time.