Business & Finance news- Marathi

Click here for Free NRI Matrimony Listing App
  • Japan Election २०२६ : जपानमध्ये राजकीय भूकंप, तीन महिन्यातच संसद बरखास्त; ताकाची यांचा मोठा निर्णय... January 24, 2026
    टोकियो : जपानच्या राजकारणात एक अनपेक्षित आणि ऐतिहासिक पाऊल उचलण्यात आले आहे. देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान साने ताकाची यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या तीन महिन्यांतच संसदेचे कनिष्ठ सभागृह बरखास्त करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे जपानमध्ये ८ फेब्रुवारी २०२६ रोजी मध्यावधी सार्वत्रिक निवडणुका होणार असून, संपूर्ण राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. ऑ […]
  • फणसाड अभयारण्यात ३० जानेवारीपासून पक्षी गणना January 24, 2026
    सिटीझन सायन्स उपक्रमाद्वारे वैज्ञानिक निरीक्षणे नोंदवण्याची संधी अलिबाग : रायगड जिल्ह्यातील निसर्गसंपन्न फणसाड वन्यजीव अभयारण्यात पुन्हा एकदा पक्षांचा किलबिलाट मोजला जाणार आहे. 'ग्रीन वर्क्स ट्रस्ट' आणि 'महाराष्ट्र वन विभाग' (ठाणे वन्यजीव विभाग) यांच्या संयुक्त विद्यमाने ३० जानेवारी ते १ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत 'फणसाड पक्षी गणना […]
  • जिल्हा परिषदेसाठी ४१, तर पंचायत समितीसाठी ८३ अर्ज January 24, 2026
    पनवेल : रायगड जिल्हा परिषद आणि पनवेल पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून, पनवेल तालुक्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. तालुक्यातून जिल्हा परिषदेच्या ८ गटांसाठी ४१, तर पंचायत समितीच्या १६ गणांसाठी एकूण ८३ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. पनवेलमध्ये यंदाही मुख्य लढत भाजप आणि शेकाप यांच्यातच होणार असल्याचे […]
  • सुधागडमध्ये २ गट, ४ गणांसाठी ३४ उमेदवार January 24, 2026
    सुधागड : रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यात आगामी जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून, तालुक्याचे राजकीय चित्र आता स्पष्ट झाले आहे. एकूण ३४ उमेदवारांनी आपले नशीब आजमावण्यासाठी मैदानात उडी घेतली असून, राष्ट्रीय व प्रादेशिक पक्षांसह अपक्षांची मोठी संख्या असल्याने यंदाची निवडणूक अत्यंत चुरशीची ठरणा […]
  • जिल्हा परिषद निवडणुकीसाठी १ हजार ७२ उमेदवार रिंगणात January 24, 2026
    छाननीनंतर १६ अर्ज बाद, राजकीय हालचालींना वेग अलिबाग : रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक अंतर्गत उमेदवारी अर्जाची छाननी प्रक्रिया पूर्ण झाली असून, जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसाठी दोन्ही मिळून १,०७२ उमेदवार रिंगणात आहेत. २३, २४, २७ जानेवारी या तीन दिवसांत कोणकोण उमेदवारी अर्ज मागे घेणार यावरून लढतीचे खरे चित्र स्पष्ट होणार आहे. १५ पंचाय […]