Maharashtra state news- Marathi

Click here for Free NRI Matrimony Listing App
  • सभा चालू द्या December 2, 2025
    पंधरा दिवसांचं कामकाज आखलेल्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा पहिला दिवस काल तुलनेने शांतपणे व्यतीत झाला. संसदेचं अधिवेशन आणि गोंधळ हाच रिवाज झालेल्या परंपरेत अशी शांतपणे सुरुवात होणं हाच शुभशकुन मानायचा का, हे उरलेले १४ दिवस सांगतील. अधिवेशनात होणारा गोंधळ आणि त्यामुळे अपेक्षित चर्चांसह न होणारं कामकाज पाहून यावेळी सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीने अधिवेशनाप […]
  • पालिका निवडणुकीत दक्षिण महाराष्ट्रातील नेत्यांची प्रतिष्ठा पणाला December 2, 2025
    स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीने दक्षिण महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर आठ-नऊ वर्षांनंतर स्थानिक पातळीवरील रणधुमाळी गाजली आहे. राज्य निवडणूक आयोगाने ४ नोव्हेंबर रोजी जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार पक्ष आणि नेत्यांना पुरता एक महिनाही मिळाला नाही. चिन्ह मिळाल्यानंतर अवघे सहा दिवस प्रचार झाला. परिणामी नेते फार काही करू शकले नाहीत. रात्र थोडी सोंगे फार अशा […]
  • कामगार संहितेमुळे आधुनिक आणि दूरदर्शी युगाचा प्रारंभ December 2, 2025
    वीणू जयचंद (लेखिका EY मध्ये पार्टनर असून आफ्रिका, भारत आणि आग्नेय आशियातील परफॉर्मन्स इम्प्रूव्हमेंट आणि कौशल्य विकास क्षेत्रात त्यांना व्यापक अनुभव आहे. सर्वसमावेशक आर्थिक प्रगतीला चालना देण्याच्या प्रयत्नांमध्ये त्या अग्रभागी राहिल्या आहेत.) भारत स्वातंत्र्यानंतर सर्वात परिवर्तनकारी कामगार सुधारणांपैकी एक असलेल्या सुधारणांच्या उंबरठ्यावर उभा आहे. वेतन संहि […]
  • नाशिक जिल्ह्यातील ११ नगर परिषदांसाठी आज होणार मतदान December 2, 2025
    नगरसेवक पदासाठी १०२८, तर नगराध्यक्षपदासाठी ६१ उमेदवार आखाड्यात नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यातील ११ नगरपरिषदांमधील नगराध्यक्ष आणि नगरसेवक निवडीसाठी आज मंगळवार (दि. २ डिसेंबर) रोजी मतदान होणार आहे. मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासकीय तयारी पूर्ण झाली असून अधिकारी व कर्मचारी सोमवारी सायंकाळीच संबंधित मतदान केंद्रांकडे रवाना झाले. नगरसेवक पदासाठ […]
  • दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, २ डिसेंबर २०२५ December 2, 2025
    पंचांग आज मिती मार्गशीर्ष शुद्ध द्वादशी शके १९४७, चंद्र नक्षत्र अश्विनी,योग वरीयान , चंद्र राशी मेष,भारतीय सौर मार्गशीर्ष ११ शके १९४७, मंगळवार दिनांक २ डिसेंबर २०२५.मुंबईचा सूर्योदय ०६.५५, मुंबईचा सूर्यास्त ०५.५९, मुंबईचा चंद्रोदय ०३.३१, मुंबईचा चंद्रास्त ०४.५२ उद्याची, राहू काळ ०३.१३ ते ०४.३६ ,भौम प्रदोष,शुभ दिवस दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) मेष : स […]
  • कुंभमेळा आरक्षित क्षेत्राचे संपादन न करता कारवाई रद्द करावी December 2, 2025
    नाशिक (प्रतिनिधी): नाशिक महानगरपालिका विकास आराखड्यानुसार साधूग्राम व संलग्न सुविधांसाठी एकूण सुमारे ३७७ एकर क्षेत्र आरक्षित करण्यात आलेले आहे. यापैकी सुमारे ९४ एकर क्षेत्र महानगरपालिकेकडून संपादित करण्यात आले असून उर्वरित २८३ एकर क्षेत्राचे संपादन प्रलंबित आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या काळात उपलब्ध मोकळ्या जागेचा वापर मंदिरांशी संलग्न व्यवस्था व आखाड्यांच्या […]
  • दितवाह चक्रीवादळाचा प्रकोप, ३३४ जणांचा मृत्यू; भारत श्रीलंकेच्या मदतीसाठी धावला December 2, 2025
    कोलंबो(वृत्तसंस्था):श्रीलंका सध्या शतकातील सर्वात मोठ्या आपत्तीचा सामना करत आहे कारण दितवाह चक्रीवादळाने देशभरात कहर केला आहे. आतापर्यंत ३३४ लोकांचा मृत्यू झाला आहे आणि ३७० हून अधिक लोक बेपत्ता आहेत. सर्वात मोठे नुकसान पर्वतीय प्रदेशात झाले आहे, जिथे मोठ्या संख्येने मलाय्याह तमिळ राहतात आणि काम करतात. हा समुदाय श्रीलंकेतील सर्वात आर्थिकदृष्ट्या असुरक्षित मान […]
  • महापरिनिर्वाण दिनानिमित्त १२ अतिरिक्त उपनगरी गाड्या December 2, 2025
    मुंबई (प्रतिनिधी) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिन २०२५ निमित्त प्रवाशांच्या सुविधेसाठी ५ आणि ६ डिसेंबर (शुक्रवार – शनिवार)च्या मध्यरात्री परळ– कल्याण आणि कुर्ला – वाशी/पनवेल दरम्यान मध्य रेल्वे १२ अतिरिक्त उपनगरी विशेष गाड्या चालवणार आहे. या उपनगरी विशेष गाड्या सर्व स्थानकांवर थांबा देतील. मुख्य मार्ग – अप विशेष गाड्या (कल्याण/ठाणे […]
  • महाराष्ट्रात गारठा वाढला, काही भागांत पावसाची शक्यता! December 2, 2025
    पुणे : बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या 'दितवाह' चक्रीवादळाचा परिणाम देशभर जाणवू लागला असून, अनेक राज्यांमध्ये वातावरण ढगाळ, तर उत्तरेकडील भागात थंडीचा जोर वाढला आहे. पर्वतीय प्रदेशात हिमवर्षाव पुन्हा सुरु झाल्याने थंड वारे देशभर पसरत आहेत. त्याचा फटका महाराष्ट्रालाही बसत असून, पहाटेच्या वेळेत गारठा तीव्र जाणवत आहे. दिवसभरात तापमान स्थिर राहिले तरी […]
  • ज्येष्ठांचा सन्मान करून साजरा केला ‘आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिन' December 2, 2025
    मुंबई (विशेष प्रतिनिधी) - आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त ज्येष्ठ नागरिकांप्रती बांधिलकी जपणारा आनंदमय सोहळा माटुंगा येथील यशवंत नाट्य मंदिरात पार पडला. मुंबई महानगरपालिकेच्या नियोजन विभागामार्फत आयोजित ह्या सोहळ्यामध्ये ७०० हून अधिक ज्येष्ठ नागरिकांनी सहभाग नोंदविला. या कार्यक्रमाला बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संचालक (नियोजन) डॉ. प्राची जांभेकर, मह […]

 

 

Unable to display feed at this time.