National News – Marathi

Click here for Free NRI Matrimony Listing App
 • ठाकरे सरकारकडून मराठ्यांचा विश्वासघात May 6, 2021
  नवी दिल्ली, (वृत्तसंस्था) : राज्यासह संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या मराठा आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टाने महत्त्वाचा निर्णय दिला असून मराठा आरक्षण रद्द केले आहे. राज्य सरकारने बनविलेला मराठा आरक्षण कायदा सुप्रीम कोर्टाने रद्द केला. त्यामुळे महाराष्ट्र सरकारला फार मोठा धक्का बसला आहे. मराठा आरक्षणाच्या वैधतेला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. या प्रकर […]
 • देशात कोरोनाची तिसरी लाट अटळ May 6, 2021
  वृत्तसंस्था : नवी दिल्ली : देशात कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर सल्लागार शास्त्रज्ञांनी आणखी एक धोक्याचा इशारा दिला आहे. देशात कोरोनाची तिसरी लाट येणार आणि ती थोपवता येऊ शकणार नाही, असं शास्त्रज्ञांनी म्हटलं आहे. कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा सामना करण्यासाठी आता लसी अद्ययावत करणं आवश्यक आहे. तसंच लसीकरण कार्यक्रमाला वेग देणं गरजेचं आहे. दे […]
 • शाळाच उघडल्या नाहीत, पूर्ण फी का भरायची? May 5, 2021
  नवी दिल्ली, (वृत्तसंस्था) : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी विविध ठिकाणी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे देशात आर्थिक संकट निर्माण झाले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरातील शैक्षणिक संस्थासुद्धा गेल्या वर्षभरापासून बंदच आहेत. शैक्षणिक संस्थांमध्ये मिळणाऱ्या सुविधा विद्यार्थ्यांना मिळालेल्या नाहीत. शैक्षणिक संस्थांमध्ये होणारे खर्च हे कमी झालेले आहेत. मात्र त […]
 • कोरोनामुळे आयपीएल स्पर्धा रद्द May 4, 2021
  मुंबई (प्रतिनिधी) : देशात सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातला आहे. त्याचा फटका आयपीएललाही बसला असून स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सोमवारी कोलकाता संघाच्या दोन खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्यानंतर बंगळुरुसोबत होणारा सामना पुढे ढकलावा लागला. दरम्यान चेन्नईच्याही तिघांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यानंतर मंगळवारी हैदराबादचा वृद्धिमान साहा य […]
 • ममता बॅनर्जी उद्या घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ May 4, 2021
  कोलकाता (वृत्तसंस्था) : तिसऱ्यांदा बहुमत मिळवत सत्तेत आलेल्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री बॅनर्जी बुधवारी (५ मे) मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. निवडून आलेल्या सर्व आमदारांचा शपथविधी ६ मे रोजी होणार आहे. दरम्यान, विजयी रॅली काढू नका, असे आवाहन ममता बॅनर्जी यांनी केले आहे. तृणमूल काँग्रेसने दणदणीत विजय मिळवला असला, तरी नंदीग्राममधून निवडणूक लढवणाऱ्या ममता ब […]
 • देशभर पुन्हा संपूर्ण लॉकडाऊन? May 4, 2021
  नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाचा वाढता फैलाव रोखण्यासाठी देशात संपूर्ण लॉकडाऊन करण्याचा सल्ला द लॅन्सेट इंडिया टास्क फोर्सने केंद्र सरकारला दिला आहे. वास्तविक पाहता पुन्हा लॉकडाऊन करण्याचा सल्ला सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिला होता. मात्र, सध्या तशी वेळ आली नसल्याचे केंद्र सरकारकडून सांगण्यात आले. परंतु, टास्क फोर्सच्या सल्ल्यानंतर देशभरात पुन्हा […]
 • दिल्ली स्टेडियममधील ५ कर्मचाऱ्यांना कोरोना May 4, 2021
  नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) १४व्या हंगामात कोरोनाने शिरकाव केला आहे. कोलकाताचे दोन खेळाडू पॉझिटिव्ह आढळल्यानंतर चेन्नई सुपर किंग्जच्या तीन सदस्यांनाही करोनाची लागण झाली आहे. त्यातच अरुण जेटली स्टेडियमवर कार्यरत असलेले दिल्ली अँड डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनचे (डीडीसीए) पाच ग्राउंड कर्मचारी कोरोना संक्रमित असल्याचे आढळले आहे. त […]

 

Unable to display feed at this time.

 

Unable to display feed at this time.