Latest News -Marathi

Click here for Free NRI Matrimony Listing App
 • सलग सुट्ट्यांमुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर वाहतूक कोंडी August 13, 2022
  मुंबई : सलग चार दिवस सुट्ट्यांमुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर वाहनांच्या लांबच-लांब रांगा लागल्या आहेत. सलग सुट्ट्यांमुळे मुंबईहून पर्यटनासाठी लोक मोठ्या संख्येने बाहेर पडले आहेत. याचा थेट परिणाम एक्स्प्रेसवेवरच्या वाहतूकीला झाल्याचे पाहायला मिळाले. खालापूर टोल नाक्याजवळ सुमारे दोन ते अडीच किलोमीटर लांब वाहनांची रांग लागली. शनिवार-रविवारची सुट्टी आणि त्यानंतर […]
 • जळगावात ऑनर किलिंग; भावाकडून बहिणीसह प्रियकराची ह्त्या August 13, 2022
  जळगाव : जळगाव जिल्ह्यातील चोपड्यात ऑनर किलिंगचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भावाने त्याच्या बहिणीच्या प्रियकराची गोळी मारून हत्या केली. तर, बहिणीचा गळा घोटून हत्या केली. चोपडा शहरालगत असलेल्या जुना वराड शिवारात या दोघांचेही मृतदेह आढळून आले आहेत. प्रेमप्रकरणातून हे हत्याकांड झाल्याचे सांगितले जात आहे. वर्षा समाधान कोळी (वय २०, रा. सुंदरगगढी, चोपडा ) आणि [ […]
 • मुंब्र्यात इमारतीचा काही भाग बाजूच्या चाळीवर कोसळला August 13, 2022
  ठाणे/ मुंब्रा : डायघर गावातील नाक्याजवळ असलेल्या जयंता अपार्टमेंट या तळ अधिक पाच मजली इमारतीच्या एका बाजूचा काही भाग शुक्रवारी रात्री उशिरा बाजूच्या चाळीतील घरावर कोसळला. यामुळे उर्वरीत इमारत एका बाजूला झुकलेली आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी व कोणालाही दुखापत झालेली नाही. या इमारतीच्या तळमजल्यावरती एकूण १५ दुकान गाळे असून सदर सर्व गाळ्यातील व्यावसायिकांना प […]
 • न्यूयॉर्कमध्ये लेखक सलमान रश्दींवर प्राणघातक हल्ला August 12, 2022
  न्यूयॉर्क : बुकर पुरस्कार विजेते लेखक सलमान रश्दी यांच्यावर अमेरिकेतील न्यूयॉर्क येथे प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात जखमी झालेल्या सलमान रश्दी यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. हल्लेखोराला ताब्यात घेण्यात आले आहे. चौटौका संस्थेच्या व्यासपीठावर एका व्यक्तीने व्याख्यानापूर्वी ७५ वर्षीय सलमान रश्दी यांच्यावर चाकूने हल्ला […]
 • शिंदे गट दादरमध्येच प्रतिसेनाभवन आणि प्रभागात स्वतंत्र शाखा उभारणार August 12, 2022
  मुंबई : मुंबईतील लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी दादरमध्ये शिंदे गटाचे मुख्य कार्यालय उभारण्यात येणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वत: या कार्यालयातून जनतेच्या समस्या जाणून घेणार आहेत. येत्या १५ दिवसांमध्ये या कार्यालयाचे उद्घाटन होणार आहे. शिंदे आणि ठाकरे वाद आता चांगलाच उफाळून आला असून दोघांच्या चुरशीची लढत सुरू आहे. या लढतीत आता शिंदे गटाने नवा डाव […] […]

 


 


 

Unable to display feed at this time.