Sports News – Marathi

Click here for Free NRI Matrimony Listing App
  • Rafael Nadal : राफेल नदालची निवृत्तीची घोषणा; चाहत्यांना धक्का October 10, 2024
    माद्रीद : टेनिस जगावर राज्य करणारा आणि २२ वेळा ग्रँडस्लॅम विजेता राफेल नदालने (Rafael Nadal) व्यावसायिक टेनिसमधून निवृत्ती घेण्याची घोषणा केली आहे. ३८ वर्षीय नदाल नोव्हेंबरमध्ये मलागा येथे होणाऱ्या डेव्हिस कप फायनलमध्ये शेवटचा सामना खेळणार आहे, त्यामध्ये तो स्पेनचे प्रतिनिधित्व करणार आहे. गुरुवारी व्हिडिओ संदेशाद्वारे त्याने ही घोषणा केली. नदाल म्हणाला, की ज […]
  • भारत दौऱ्यावर येणारा न्यूझीलंड संघ जाहीर; लॅथम कर्णधार October 9, 2024
    नवी दिल्ली : भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी नुतीच न्यूझीलंड संघाची घोषणा करण्यात आली आहे. ३ सामन्यांच्या मालिकेसाठी टॉम लॅथमला कर्णधारपद देण्यात आले आहे. पूर्णवेळ कर्णधार झाल्यानंतर तो प्रथमच संघाचे नेतृत्व करणार आहे. न्यूझीलंड संघ शुक्रवार, ११ फेब्रुवारी रोजी भारतीय दौऱ्यासाठी रवाना होणार आहे. सध्या संघ श्रीलंका दौऱ्यावर आहे. संघाला ०-२ असा पराभव स्वीकार […]
  • जो रूट अव्वल फलंदाज; डब्लूटीसीमध्ये ५००० धावा, पाकविरुद्ध मुलतान कसोटीत झळकावले शतक October 9, 2024
    मुलतान : इंग्लिश फलंदाज जो रूट हा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये ५ हजार धावा पूर्ण करणारा जगातील पहिला फलंदाज ठरला आहे. पाकिस्तानविरुद्ध मुलतान कसोटीत त्याने शतक झळकाले. मुलतान कसोटीच्या तिसऱ्या दिवशी बुधवारी शतक झळकावल्यानंतर जो रूट टॉप-५ कसोटी धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत सामील झाला. या यादीत अव्वल क्रमांकावर सचिन तेंडुलकर असून त्याने कसोटीत १५ हजार ९२१ […]
  • महमुदुल्लाहने टी-२० मधून केली निवृत्ती जाहीर October 9, 2024
    हैदराबादमध्ये भारताविरुद्ध शेवटचा सामना खेळणार दिल्ली : बांगलादेशचा माजी कर्णधार शकिब अल हसननंतर आता फलंदाज महमुदुल्लाहनेही टी-२० फॉर्मेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. भारताविरुद्ध सुरू असलेल्या मालिकेतील शेवटच्या सामन्यासह तो सर्वात लहान फॉर्मेटला अलविदा करेल. हा सामना १२ ऑक्टोबर रोजी हैदराबाद येथे होणार आहे. ३८ वर्षीय महमुदुल्लाहने २०२१मध्येच कसोटी फॉर्मेटम […]
  • Sachin Tendulkar : क्रिकेटचा देव मैदानात उतरणार! २४ वर्षांनंतर होणार टीम इंडियाचा कर्णधार October 9, 2024
    मुंबई : क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) २४ वर्षांच्या अंतरानंतर पुन्हा एकदा टीम इंडियाचे (Team India) नेतृत्व करणार (Captain) आहे. सचिनला इंटरनॅशनल मास्टर्स लीगमध्ये (International Masters League) टीम इंडियाच्या कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. त्यामुळे त्याच्या चाहत्यांमध्ये उत्साह उसळला आहे. या विशेष लीगची सुरुवात १७ नोव्हेंबर रोजी मुंबई […]
  • लिमा ज्युनियरमध्ये भारत २४ पदकांसह अव्वल October 7, 2024
    पुरुषांच्या ५० मीटर ज्युनियर पिस्तुल स्पर्धेत भारताने जिंकले सांघिक सुवर्णपदक दीपक दलाल, कमलजीत, राज चंद्रा यांचा समावेश नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पेरूची राजधानी लिमामध्ये पार पडलेल्या जागतिक ज्युनियर नेमबाजी स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी पुरुषांच्या ५० मीटर पिस्तूल सांघिक प्रकारात सुवर्णपदक जिंकले. दीपक दलाल (५४५), कमलजीत (५४३) आणि राज चंद्रा (५२८) यांच्या भा […]
  • मुंबईने २८ वर्षानंतर जिंकला इराणी चषक! October 5, 2024
    मुंबई : मुंबईने तब्बल २८ वर्षांनंनतर इराणी कपवर नाव कोरले आहे. शेष भारताविरूद्धचा हा सामना पाचव्या दिवशी ड्रॉ जाहीर करण्यात आला आणि पहिल्या डावातील आघाडीमुळे मुंबई संघ विजयी घोषित करण्यात आला. पहिल्या डावात मुंबईची घसरलेली खेळी तनुष कोटियनने पुन्हा उभारण्यास सुरूवात केली आणि शतकापर्यंत मजल मारली. त्याला मोहित अवस्थीची साथ मिळाली व या दोन फलंदाजांनी […]
  • माजी क्रिकेटरच्या आईचा फ्लॅटमध्ये आढळला मृततेह, पोलिसांचा तपास सुरू October 4, 2024
    पुणे: माजी क्रिकेटर आणि बॉलिवूड अभिनेता सलील अंकोलाच्या आईचे निधन झाले आहे. त्यांचा मृतदेह पुण्याच्या फ्लॅटमध्ये आढळला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार पीडित महिलेच्या गळ्यावर जखमेचे निशाण आहेत. दरम्यान ही हत्या आहे की नैसर्गिक मृत्यू याचा तपास पोलीस करत आहेत. घरात जबरदस्ती घुसल्याचे कोणतेही निशाण नाहीत. सलिल अंकोला यांनी आपल्या आईच्या निधनाची बातमी सोशल मीडियाव […]

 

Unable to display feed at this time.

 

Unable to display feed at this time.