Sports News – Marathi

Click here for Free NRI Matrimony Listing App
 • गांगुली, सेहवाग पुन्हा मैदान गाजवणार August 12, 2022
  नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : एकेकाळी मैदान गाजवणारे सौरव गांगुली, विरेंद्र सेहवाग, कैफ, पठाण हे भारताचे दिग्गज खेळाडू पुन्हा क्रिकेटच्या मैदानात धडाकेबाज कामगिरी करण्यासाठी सज्ज आहेत. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त १५ सप्टेंबरला इंडिया महाराजास आणि वर्ल्ड जाएंट्स यांच्यात क्रिकेटच्या मैदानावर महासंग्राम होणार आहे. लिजंट्स लीग क्रिकेट (एलएलसी) निमि […]
 • विराटचा विक्रम मोडण्याची रोहितला संधी August 12, 2022
  नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आशिया चषक स्पर्धेला २७ ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेनिमित्त भारताचा कर्णधार रोहित शर्माला माजी कर्णधार विराट कोहलीचा विक्रम मोडण्याची संधी आहे. आपल्या नेतृत्वाखाली टी-२० सामने जिंकण्याच्या विक्रमामध्ये विराट कोहलीला मागे टाकण्याची संधी रोहितकडे आहे. आशिया चषक स्पर्धा ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सुरू होणार आहे. आश […]
 • पाकचे दोन बॉक्सर बर्मिंगहॅममधून बेपत्ता August 11, 2022
  कराची (वृत्तसंस्था) : बर्मिंगहॅम राष्ट्रकुल २०२२ स्पर्धेचे सूप नुकतेच वाजले. या स्पर्धेमधून पाकिस्तानचे दोन बॉक्सर बेपत्ता झाल्याचे समोर आले आहे. सुलेमान बलूच आणि नजीरुल्लाह खान अशी या दोघांची नावे आहेत. राष्ट्रीय महासंघाने याबाबत माहिती दिली असून पाकिस्तान बॉक्सिंग फेडरेशनचे सचिव नासेर तांग यांनी या वृत्ताला दुजोरा दिलाय. “सुलेमान बलूच आणि नजीरुल्लाह खान या […]
 • राष्ट्रकुल पदक विजेत्यांमध्ये तीन मुंबईकरांचा समावेश August 11, 2022
  मुंबई (वार्ताहर) : बर्मिंगहॅम येथे नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताने २२ सुवर्णांसह ६१ पदकांची कमाई करताना चौथे स्थान मिळवले आहे. पदक विजेत्यांमध्ये मुंबईचे अवघे तीन खेळाडू आहेत. त्यात बॅडमिंटन दुहेरीत सुवर्ण कामगिरी केलेला चिराग शेट्टी आणि टेबल टेनिस विजेत्या पुरुष संघातील सनिल शेट्टी यांचा समावेश आहे. मुंबईच्या खेळाडूंनी दोन सुवर्ण ति […]
 • भवानी देवीने सीडब्ल्यूजी फेन्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकले सुवर्णपदक August 10, 2022
  लंडन (वृत्तसंस्था) : बर्मिंगहॅमपाठोपाठ आता लंडनमध्येही भारतीय खेळाडूंनी तिरंगा फडकवला आहे. सीडब्ल्यूजी फेन्सिंग चॅम्पियनशिपमध्ये तलवारबाजी या क्रीडा प्रकारात बुधवारी भारताच्या भवानी देवीने सुवर्णपदक जिंकण्याची कामगिरी केली. त्यामुळे बुधवारी सकाळी भारतवासीयांना आणखी एक अभिमानाचा क्षण अनुभवायला मिळाला. सेव्हर प्रकारातील अंतिम सामन्यात भारताची २८ वर्षीय तलवारबा […]
 • चेस ऑलिम्पियाड पदक विजेत्या खेळाडूंना १ कोटी August 10, 2022
  चेन्नई (वृत्तसंस्था) : चेन्नईमध्ये नुकतीच ४४वी चेस ऑलिम्पियाड स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत पदक विजेत्या प्रत्येक खेळाडूला १ कोटी रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणा तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी केली आहे. त्यामुळे आता हे पदक विजेते खेळाडू मालामाल होणार आहेत. चेन्नईमध्ये झालेल्या ४४व्या चेस ऑलिम्पियाडमध्ये भारतीय पुरूष ब संघाने कांस्य तर महिला अ संघाने दे […]
 • सोनेरी पहाट August 9, 2022
  रोहित गुरव गेले ११ दिवस सुरू असलेला राष्ट्रकुल २०२२ स्पर्धेचा थरार अखेर सोमवारी थांबला. स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच भारतीय खेळाडूंनी पदकतालिकेत वर्चस्व राखत बर्मिंगहॅममध्ये तिरंगा डौलाने फडकवला. शेवटचे दोन दिवस गाजवत भारतीय खेळाडूंनी पदकांची अक्षरश: लयलूट केली. पी. व्ही. सिंधू, लक्ष्य सेन, सात्विक-चिराग, अचंता शरथ कमल यांनी शेवटच्या दिवशी सुवर्णपदकांचा चौकार […]
 • आयसीसीचे माजी अंपायर रुडी कर्टझन यांचे कार अपघातात निधन August 9, 2022
  जोहान्सबर्ग (वृत्तसंस्था) : आयसीसीचे माजी अंपायर रुडी कर्टझन यांचे मंगळवारी कार अपघातात निधन झाल्याची माहिती मिळाली. ते ७३ वर्षांचे होते. रुडी हे एक आयसीसीचे सर्वोकृष्ट अंपायर पैकी एक होते. मिळालेल्या माहितीनुसार रुडी यांच्याबरोबरच इतर तीन जणांची रस्ते अपघातात समोरासमोर जोरदार धडक झाली. ही घटना मंगळवारी सकाळी दक्षिण आफ्रिकेच्या रिडरडेल भागात घडली. रुडी हे एक […]

 

Unable to display feed at this time.

 

Unable to display feed at this time.