Maharashtra state news- Marathi

Click here for Free NRI Matrimony Listing App
 • दरडींखाली कोकण! July 24, 2021
  मुंबई (प्रतिनिधी) : राज्यात मुसळधार पावसाने रौद्ररूप धारण केले असतानाच कोकणातील रायगड तसेच रत्नागिरी जिल्ह्यांत अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या. त्यात झालेल्या दुर्घटनांमध्ये जवळपास ६० लोकांना प्राण गमवावे लागले. महाड तालुक्यातील तळीये गावात दरड कोसळून ३८ जणांचा मृत्यू झाला आहे. पोलादपूर येथील गोवेले गावातील सुतारवाडी येथे घरांवर दरड कोसळल्याने ११ जण ठार झाले. खेड […]
 • तळीये गावावर दु:खाचा डोंगर; गाडली गेली ३२ कुटुंबे July 24, 2021
  प्रफुल्ल पवार अलिबाग : रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात दुर्गम डोंगराळ भागात वसलेल्या तळीये गावातील ३२ घरांवर दरड कोसळून ही कुटुंबे मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेली. यातील ३८ जणांचे मृतदेह स्थानिक नागरिक आणि पोिलसांनी बाहेर काढले. दोन महिलांना वाचवण्यात यश आले असले तरी त्या गंभीर जखमी आहेत. अजूनही अनेकजण या ढिगाऱ्याखाली असल्याची भीती व्यक्त होत आहे. दरडीच्या […]
 • रत्नागिरी जिल्ह्याने महाबळेश्वरलाही टाकले मागे; मुसळधार पावसात देशात दुसऱ्या क्रमांकावर July 24, 2021
  रत्नागिरी (प्रतिनिधी) : भारतीय हवामान शास्त्र विभागाने देशातील पावसाची महत्त्वाची ठिकाणे आणि प्रमुख शहरांची यादी जाहीर केली आहे. या यादीनुसार, राज्यातील रत्नागिरी जिल्ह्याने पावसात महाबळेश्वरला मागे टाकून दुसरे स्थान पटकावले आहे. देशात मेघालय आणि आसामच्या काही विभागांमध्ये दरवर्षी मोठ्या पावसाची नोंद होते. देशात दरवर्षीचा विचार केला तर सर्वाधिक पाऊस मेघालयात […]
 • आम. नितेश राणे यांनी खारेपाटण येथील पूरग्रस्तांची घेतली भेट July 24, 2021
  खारेपाटण : खारेपाटण बाजारपेठेत पाणी घुसून मोठे नुकसान झालेल्या कुटुंबांची भेट घेऊन आमदार नितेश राणे यांनी पुरस्थितीची पाहणी केली. नंतर पुरामुळे झालेल्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करून आ. राणे यांनी अधिकाऱ्यांना पंचनाम्याचे आदेश दिले.खारेपाटण बाजारपेठेत जाण्यासाठी पर्यायी मार्ग आणि सुखनदीचा गाळ उपसा करून बाजारपेठ सुरक्षित करण्याचे आश्वासन दिले. पुराचे पाणी ओस […]
 • पूरस्थिती हाताळण्यात ठाकरे सरकार अपयशी; केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा प्रहार July 23, 2021
  नवी दिल्ली (प्रतिनिधी) : कोकणातील सर्वत्र मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. अशात नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यासाठी हेलिकॉप्टरसह सर्व आवश्यक ती मदत केंद्र सरकारकडून केली जाईल, असे आश्वासन केंद्रीय सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी गुरुवारी प्रसारमाध्यमांसोबत बोलताना कोकणवासीयांना दिले. तर पूर परिस्थिती हाताळण्यात राज्यातील ठाकरे सरकार पू […]
 • कोकणात पाऊसमारा July 23, 2021
  राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाचे धुमशान सुरू असून पूरसंकट कोसळले आहे. कोकणाला या ‘पाऊसमारा’ चा सर्वाधिक फटका बसला आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यातील अनेक शहरांमध्ये आणि गावांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने हाहाकार उडाला आहे. अतिवृष्टीमुळे विशेषतः रत्नागिरी, रायगड जिल्ह्यांत पूरस्थिती निर्माण झाली असून दोन महिला वाहून गेल्या, तर हजारो घरे पाण्याखाल […]
 • मदत लवकर पोहोचवा; निलेश राणे यांचे आवाहन July 23, 2021
  मुंबई (प्रतिनिधी) : रत्नागिरी जिल्ह्याच्या चिपळूणमधील परिस्थिती गंभीर आहे. त्यामुळे सरकारने यांची योग्य दखल घेऊन तेथील नागरिकांना लवकरात लवकर मदत कशी मिळेल याची आखणी करावी, असे आवाहन माजी खासदार आणि विद्यमान भाजप प्रदेश सचिव निलेश राणे यांनी केले आहे. बुधवारी सायंकाळपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीसदृश्य पावसामुळे वशिष्ठी आणि शिव नदीला पूर आला असून या पुराने चि […]
 • आ. नितेश राणे यांनी मल्हार नदीवरील पुलाची केली पाहणी July 23, 2021
  सिंधुदुर्गनगरी : सांगवे-कनेडी – नाटळ येथील मल्हार नदीवरील वाहून गेलेल्या पुलाची भाजप आमदार नितेश राणे यांनी पाहणी केली. नाटळ, दारीस्ते, दिगवळे, नरडवे या गावांना जोडणार हा मुख्य पूल असल्याने या गावांचा संपर्क तुटलेला आहे. कोसळलेल्या पुलाची पाहणी करून आमदार नितेश राणे यांनी त्याच ठिकाणाहून बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून […]
 • दोन डोस घेतलेल्यांना बाहेर पडण्याची परवानगी मिळावी July 22, 2021
  पुणे (प्रतिनिधी) : कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोठ्या प्रमाणावर केलं पाहिजे आणि दोन डोस घेतलेल्यांना हळूहळू बाहेर पडायची परवानगी दिली पाहिजे, असं माझं वैयक्तिक मत आहे. त्याबाबत मी शुक्रवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवड प्रसारमाध्यमांना सांगितले. ‘प्रत्येकाची मते वेगवेगळी आहेत. काही जणांना वाटतं पुढ […]
 • राज्यात ८,१५९ नवे कोरोनाबाधित, १६५ मृत्यू July 22, 2021
  मुंबई (प्रतिनिधी) : मागील २४ तासांत राज्यात ८ हजार १५९ नवे कोरोनाबाधित आढळले असून, ७ हजार ८३९ रुग्ण बरे झाले आहेत. याशिवाय राज्यात बुधवारी १६५ बाधित रुग्णांच्या मृत्यूची देखील नोंद झाली आहे. राज्यात कालपर्यंत एकूण ६०,०८,७५० बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९६.३३ टक्के एवढे झाले […]

 

 

Unable to display feed at this time.